आमचे कार्य

परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बाल संस्कार वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण संस्था अनाथ आश्रम या आश्रमातील विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवत असताना आचार्य संतोषानंद महाराज शास्त्री संस्कृत पीएचडी विद्यार्थी

परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील आध्यात्मिक बालसंस्कार वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण संस्था अनाथआश्रम या आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण इंग्लिश लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने वाचता यावे यासाठी मी इंग्लिश वाचणारच हे पुस्तक देण्यात आले🙏🏻

परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बाल संस्कार वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण संस्था अनाथाश्रम या आश्रमातील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने संस्कृत वाचता व बोलता यावे या साठी संस्कृत शिक्षण चालू आहे 9132329393

🙏 राम कृष्ण हरी 🙏 *SDYBSS* द्वारा संचलित प.पु. गु.कर्मवीर दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बालसंस्कार वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण संस्था अनाथ आश्रम मुळेवाडी या संस्थेच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवून अनाथ गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वारकरी व शालेय शिक्षण व त्याचबरोबर मुलींना शिलाई मशीन शिक्षण कॉम्प्युटर प्रशिक्षण दिले जाते या माध्यमातून अनाथ गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला स्वच्छता कीट देण्यात येते त्याचे वितरण आज संस्थेच्या वतीने वितरित केले आहे या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज रोजी 230 विद्यार्थी अनाथ एकपालकत्व गोरगरीब, मध्यमवर्गीय परिवारातील मुले मुली शिक्षण घेत आहेत या संस्थेचा शालेय शिक्षणाचा दर्जा वारकरी शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट असून नामवंत शिक्षक वर्ग उत्कृष्ट भोजन निवास विद्यार्थ्यांना गायन वादन व योगा प्रशिक्षण या शिक्षणासाठी भव्य पटांगण उपलब्ध आहे तसेच मुलींना स्वतंत्र निवास व्यवस्था आहे मुलांना सुसज्ज इमारत स्वच्छ पाणी 24 तास लाईट सर्व सुविधा उपलब्ध आहे .. *श्री दत्त योगिराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुळेवाडी ता.कर्जत* 🙏

परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बालसंस्कार वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण संस्था अनाथ आश्रम या आश्रमातील विद्यार्थिनींना उपजीविका निर्मिती या उपक्रमांतर्गत शिवणक्लास राम कृष्ण हरी 9132329393

आध्यात्मिक वारकरी शिक्षण

श्री दत्त योगीराज बहुउद्देशी सामाजिक संस्था रजिस्टर नंबर:-५२० एफ:-११५७१
द्वारा संचलित परमपूज्य गुरुवर्य कर्मयोगी दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बाल संस्कार वारकरी गुरूकुल शालेय शिक्षण संस्था या नावाने अध्यात्मिक व शालेय शिक्षण देणारा आश्रम चालवला जातो

शालेय शिक्षण

आश्रमाचे वतीने इ. ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे.इ. ८ पर्यंत पाठ्यपुस्तकांची सुविधा. ५ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासकीय सुविधे नुसार उपलब्ध आहे संस्थेला शक्य झाल्यास सर्व वह्या व शालेय साहित्य स्कूल बॅग उपलब्धते नुसार देण्यात येते

अनाथ आश्रम

सर्व जाती धर्मातील अनाथ असणाऱ्या मुलांचे,मुलींचे पालकत्व संस्था घेते.सर्व जाती धर्मातील एक पालकत्व आई-वडील विभक्त अशा विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना संस्था सर्वतोपरी मदत करते.अनाथ विद्यार्थी असल्याचे लक्षात आल्यास संस्था स्वखर्चाने आणून संस्था आश्रमात दाखल करते.

गोशाळा

श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचलित श्री रुक्मिणी माता गोशाळा चालवली जाते या गोशाळेमध्ये सद्यस्थितीला २६० गोमाता आहेत या मध्ये काही गोमाता,भाकड, अंध,अपंग,आजारी, वयोवृद्ध गाई व वळू बैल आहेत

धार्मिक कार्यक्रम

आश्रमावर
गुरुवार,रविवार, एकादशी,पौर्णिमा व नैमित्तिक सण वार उत्सव साजरे केले जातात या निमित्ताने
कीर्तन भजन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सामाजिक कार्यक्रम

आश्रमाचे वतीने गावोगावी कीर्तन, प्रवचनाच्या,व्याख्यान या माध्यमातून व्यसनमुक्ती,बालविवाह, हुंडा बंदी,ग्राम स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधी मार्गदर्शन संस्था करते

मुलांना अत्याचाराच्या आघातातून वाचवण्यासाठी आजच दान करा

error: Content is protected !!