आमचे कार्य

आध्यात्मिक वारकरी शिक्षण
श्री दत्त योगीराज बहुउद्देशी सामाजिक संस्था रजिस्टर नंबर:-५२० एफ:-११५७१
द्वारा संचलित परमपूज्य गुरुवर्य कर्मयोगी दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बाल संस्कार वारकरी गुरूकुल शालेय शिक्षण संस्था या नावाने अध्यात्मिक व शालेय शिक्षण देणारा आश्रम चालवला जातो

शालेय शिक्षण
आश्रमाचे वतीने इ. ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे.इ. ८ पर्यंत पाठ्यपुस्तकांची सुविधा. ५ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासकीय सुविधे नुसार उपलब्ध आहे संस्थेला शक्य झाल्यास सर्व वह्या व शालेय साहित्य स्कूल बॅग उपलब्धते नुसार देण्यात येते

अनाथ आश्रम
सर्व जाती धर्मातील अनाथ असणाऱ्या मुलांचे,मुलींचे पालकत्व संस्था घेते.सर्व जाती धर्मातील एक पालकत्व आई-वडील विभक्त अशा विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना संस्था सर्वतोपरी मदत करते.अनाथ विद्यार्थी असल्याचे लक्षात आल्यास संस्था स्वखर्चाने आणून संस्था आश्रमात दाखल करते

गोशाळा
श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचलित श्री रुक्मिणी माता गोशाळा चालवली जाते या गोशाळेमध्ये सद्यस्थितीला २६० गोमाता आहेत या मध्ये काही गोमाता,भाकड, अंध,अपंग,आजारी, वयोवृद्ध गाई व वळू बैल आहेत

धार्मिक कार्यक्रम
आश्रमावर
गुरुवार,रविवार, एकादशी,पौर्णिमा व नैमित्तिक सण वार उत्सव साजरे केले जातात या निमित्ताने
कीर्तन भजन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .

सामाजिक कार्यक्रम
आश्रमाचे वतीने गावोगावी कीर्तन, प्रवचनाच्या,व्याख्यान या माध्यमातून व्यसनमुक्ती,बालविवाह, हुंडा बंदी,ग्राम स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधी मार्गदर्शन संस्था करते