आध्यात्मिक वारकरी शिक्षण

१ श्री दत्त योगीराज बहुउद्देशी सामाजिक संस्था रजिस्टर नंबर:-५२० एफ:-११५७१
द्वारा संचलित परमपूज्य गुरुवर्य कर्मयोगी दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बाल संस्कार वारकरी गुरूकुल शालेय शिक्षण संस्था या नावाने अध्यात्मिक व शालेय शिक्षण देणारा आश्रम चालवला जातो

२ आध्यात्मिक शिक्षणासाठी स्वतःच्या मालकीची सुसज्ज इमारत आहे २४ तास पाणी, वीज आणि रस्त्यावर सुविधा आहे.

३ वारकरी शिक्षण- अखिल भारतीय गंधर्व महामंडळ परीक्षा पद्धतीने शास्त्रीय गायन, पखवाज, हार्मोनियम,व संस्कृत, हरिपाठ, सकल संत अभंग, ज्ञानेश्वरी, गीतापाठ, हनुमान चालीसा, मनाचे श्लोक, मंगलाष्टके, काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, आध्यात्मिक ग्रंथ चिंतन, भागवत कथा, रामायण कथा,हे विषय विद्यार्थ्यांना आवडीनुसार शिकवले जातात.

४ विद्यार्थ्याना सुलभ वारकरी अध्यात्मिक अभ्यासक्रमासाठी वारकरी शिक्षणाची ज्ञानगंगा भाग एक, व भाग दोन स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध

५ समाज प्रबोधन कीर्तन,प्रवचन,कथा, व्याख्यान, भारुड हे विषय अग्रक्रमाने दिले जातात

६ संस्थेचा वारकरी पोशाख टोपी,पंचा,नेहरू, धोतर हा आहे

७ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम वाचनासाठी अध्यात्मिक वारकरी अनेक ग्रंथ संपदा उपलब्ध आहे.

८ सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी योगासने व्यायाम शारीरिक व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नियमित योगासने प्राणायाम शिक्षण

९ अन्नक्षेत्र सुंदर सात्विक जेवणाची व्यवस्था सकाळी नाष्टा दुपारी जेवण संध्याकाळी जेवण

१० विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना निवासा स्वतंत्र वस्तीग्रह

मुलांना अत्याचाराच्या आघातातून वाचवण्यासाठी आजच दान करा

error: Content is protected !!